![]()
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहर पोलिस ठाणे यांचे वतीने येथील कालिका देवी चौक येथील मक्का मस्जिद येथे पोलिस मित्र कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी मा. पोलिस महा संचालक साहेब यांचे पोलिस मित्र संकल्पने बद्दल सविस्तार माहिती दिली.
मक्का मस्जिद येथील सदर कार्यक्रमात मौलाना गुलाम सरवर साहेब, मौलाना गुलाम नबी अत्तारी बार्शी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुस्लिम समाजातील बांधवाना पोलिसांना सहकार्य करने बाबत आणि पोलिस मित्र मध्ये भाग घेणे बाबत आवाहन केले.
यावेळी इब्राहिम बशीर बोहरी, निसार मिन्हाज शेख, वालीजान शेख, रफीक शेख, समीर मोदी, इस्माइल बोहरी, मुजीब बगवान, हीरालाल बागवान, नूर मनेरी सह मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन इब्राहिम बोहरी यांनी केले.


