उत्तम आरोग्यसाठी सकाळी लवकर उठणे अतिशय आवश्यक असते.आणि यासाठी रात्री लवकर झोपयलाच पाहिजे.हे आता आपल्याला कळून चुकले आहे.आणि अनेक जण यासाठी प्रयत्नसुद्धा करतात पण अनेकांच्या समस्या अशा आहेत कि आम्ही दहा वाजताच बेडवर जातो पण तास दोन तास झोपच येत नाही.म्हणून नाविलाजने आम्ही टीव्ही पहात बसतो.मला वाटते माझ्या हजारो वाचकांची हीच समस्या असते.पण यावर काही उपाययोजना केल्या जात नाहीत.इथे काही सोपे उपाय मला सुचवावेसे वाटतात. रात्री जेवण वगैरे आटोपले कि घरातील लाईट्स थोड्या मंद कराव्यात.कारण झोप येण्यासाठी प्रखर लाईट्स व्यत्तय निर्माण करत असतात.आपल्या मेंदूमध्ये झोप आणणारे आणि जागे करणारे असे हार्मोन्स (मेलॅटोनिन आणि सेराटोनीन) असतात.त्यातला झोप आणण्यासाठी आवश्यक काळोख झाल्यावर बऱ्याच वेळाने निर्माण होतो.प्रकाश मंद झाल्याशिवाय झोप आणणारे स्त्राव लगेच तयार होत नाही आणि मग झोपच येत नाही.म्हणून सायंकाळी नेहमी कमीत कमी प्रकाश ठेवावा.गरजेच्या ठिकाणीच लाईट्स लावाव्यात.याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे खेड्यामधून शहाराइतका प्रकाश कधीच नसतो जे लोक शेतामधून वस्ती करून राहतात ते रात्री बारा .पर्यंत जागतच नाहीत.कारण कमी प्रकाशामुळे घरातील जवळजवळ सर्वच मंडळी नऊ ते दहा पर्यंत झोपी जाते.आणि यामुळेच तेथील स्त्रिया पहाटे उठून झाडलोट करतात,पुरुष मंडळी पहाटेच विहिरीवर पाण्यासाठी जातात.
हे चित्र काही हजारो वर्षापूर्वीचे नाही, अगदी काल परवा चे आहे.सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या आपल्या मेंदूतील झोप आणणाऱ्या आणि जागे करणाऱ्या स्त्रावाबरोबर घनिस्ट संबंध असतो.म्हणूनतर लवकर झोपा आणि लवकर उठा असे शास्त्र सांगते.रात्रीची झोप येत नसल्याचे दुसरे कारण म्हणजे झोपताना एखादा विचार करत झोपणे.विचार कधीच संपत नसतात .एक पूर्ण होण्याच्या अगोदरच दुसरा सुरु होतो.आणि हे चक्र दिवसभर म्हणजे झोप येईपर्यंत चालू असते. आपण झोपू तेवढेच विचारापासून सुट्टी.काही काळासाठी का होईना विचार शून्य जर होता आले तर सोन्याहून पिवळे,मात्र हे सर्वांनाच जमत नाही.कारण त्याला फार अभ्यास लागतो.योगी माणसाचे जीवन जगणाऱ्यानाच हे शक्य होते.मात्र आपल्या सारख्या भोगी समाजासाठी हे जरा कठीणच.पण तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे.
विचार मनात येऊ द्यायचेच नाही हे आपण करू शकत नाही पण मनात चालू असलेल्या विचाराव्यतिरिक्त दुसरा विचार मनात येऊ द्यायचा नाही हे आपण करू शकतो.बरं चाललेला विचार संपला कि दुसऱ्या विचाराला मात्र मनात येऊ द्यायचे नाही.’आता मी दुसरा विचार मनात येऊ देणार नाही,आता शांत झोपायचा प्रयत्न करतो असे मनात आणत डोळे घट्ट बंद करून घ्या आणि आता झोप येत आहे असा विचार मनात आणा.तुम्हाला झोप लागलेली समजणार सुद्धा नाही.थोडक्यात काय तर जसे आपण विचार करण्याची मुभा मेंदूला देतो तसेच झोप यायचीही दिली पाहिजे.म्हणजेच झोपेला अक्षरशः बोलवावे लागते.झोप येत आहे अशी कल्पना करावी लागते.एवढे करून बघा ,आपली झोप न येण्याची समस्या कायमची दूर होऊन जाईल.
बरेच जण हे नैसर्गिक उपचार न करता सरळ झोप येण्याच्या गोळ्या घेतात ,याचा पुढे फार दुष्परिणाम होत जातो.पुढे पुढे मग झोपेसाठी कायमच औषधाचा आधार घ्यावा लागतो.कधी कधी तर हे डोस वाढवावे हि लागतात.म्हणून झोपेसाठी लवकर बेडला जावे, झोपताना मोबाईल ,लॅपटॉप,टीव्ही हे डोळ्यावर इतरत्र ताण आणणारे उपकरनात डोळे घालून बसू नये.कारण या झोप उडवणाऱ्या वस्तू आहेत.तर आता भेटू पुढच्या लेखात.प्रश्न आणि शिबिरासाठी संपर्क करा.
बरेच जण हे नैसर्गिक उपचार न करता सरळ झोप येण्याच्या गोळ्या घेतात ,याचा पुढे फार दुष्परिणाम होत जातो.पुढे पुढे मग झोपेसाठी कायमच औषधाचा आधार घ्यावा लागतो.कधी कधी तर हे डोस वाढवावे हि लागतात.म्हणून झोपेसाठी लवकर बेडला जावे, झोपताना मोबाईल ,लॅपटॉप,टीव्ही हे डोळ्यावर इतरत्र ताण आणणारे उपकरनात डोळे घालून बसू नये.कारण या झोप उडवणाऱ्या वस्तू आहेत.तर आता भेटू पुढच्या लेखात.प्रश्न आणि शिबिरासाठी संपर्क करा.
निरसन आणि शिबिरासाठी संपर्क करा. दत्ता गायकवाड -९६१९३२४०८०.आवश्य भेट द्या,
www.dattagaikwad.com


