भारतात पहिल्यांदाचं तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध; अपत्यहीन जोडप्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार
सोलापूर, दि. २७ (प्रतिनिधी) : सध्याच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात विवाहित दांपत्यांना वंधत्त्वाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार होणारे गर्भपात, अनेकदा उपचार करूनही आणि आयव्हीएफनंतरही गर्भधारणेतील अपयशामुळे अनेक जोडपे त्रस्त आहेत. मात्र, वंधत्त्वाच्या या समस्येला तोंड देण्यासाठी आणि अपत्यहीन जोडप्यांना आशेचा किरण मिळावा यासाठी भारतात पहिल्यांदा ‘पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी’ सुविधा बंगळूरमध्ये सुरु करण्यात आली आहे. याठिकाणी अपत्यहीन जोडप्यांसाठी आधुनिक सुविधा आणि उपचाराची सोय करण्यात आली असल्याची माहिती गुणशीला फर्टिलिटी सेंटरच्या संचालक डॉ. देविका गुणशीला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंधत्त्व हा विषय अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा असल्याने अतिशय आव्हानात्मक आहे. मात्र, आता प्रत्येक अपत्यहीन जोडप्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. बंगळूर येथील ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या गुणशीला फर्टिलिटी सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपचाराची सोय करण्यात आली आहे. भारतात पहिल्यांदाचं गुणशीला फर्टिलिटी सेंटरमध्ये ही उपचार पद्धती उपलब्ध देण्यात आली आहे. यापूर्वी या सेंटरमधून वैद्यकीय संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार करण्यात आले आहेत. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये पहिले अद्ययावत पूर्वरोपण अनुवंशिक तपासणीची सुविधा याठिकाणी सुरु करण्यात आली आहे.
या नव्या क्रांतिकारक तंत्रज्ञानाने गर्भाची तपासणी करून त्यातील गुणसूत्रांच्या कमतरतेवर उपचार केल्याने अपत्यहीन महिलेला आई होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी (पीजीएस) हे आधुनिक आणि अद्यायवत तंत्रज्ञान असून गुणसूत्रातील कमतरता, त्यातील अडचणीचा शोध घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येते. जन्मदरात वाढ व्हावी आणि गर्भधारणेतील अडचणी दूर करणे हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश असल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉ. जयराम कदणदळे आणि डॉ.स्वाती शेट्टी या दोघांच्या मार्गदर्शनाखाली पहिली पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी करून गर्भधारणा यशस्वी झाली आहे.
या सुविधेमुळे वंधत्व,गर्भपाताची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय, पैसा आणि वेळ वाचणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली असून अपत्यहीन जोडप्याने गुणशीला फर्टिलिटी सेंटरशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. देविका गुणशीला यांनी केले आहे. या केंद्रामधील ०८० -२६६७३५८५ या क्रमांकावर संपर्क साधून सुविधा आणि उपचाराविषयीही माहिती घेता येणार आहे.

