जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस झाली रदद…
पदाचा मताच्या राजकारणासाठी करत होते वापर गैरवापर… जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस झाली रदद…
पदाचा मताच्या राजकारणासाठी करत होते वापर गैरवापर…
माहिती अधिकार कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी शिफारस रदद व्हावी यासाठी तक्रार केली होती दाखल…
पुणे- महिला व बालकल्याण , समाजकल्याण, कृषी विभागामार्फत 10% निधीमधून वैयक्तित लाभांच्या योजनेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची शिफारसी रदद करण्यात यावी.अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते बाबाजी पवळे यांनी नोव्हेंबर मध्ये श्री. कांतिलाल उमाप ,मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केली होती.त्यांच्या सततचा पाठपुरावा व लढ्याला पाच महिन्याच्या आतमध्ये यश आले असून, जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस रद्द केल्याचा आदेश १३/३/२०१६ रोजी जिल्हा महिला व बालकल्याण, समाजकल्याण अधिकारी यांनी दिला आहे.यामुळे ग्रामीण भागातील गरजू गोरगरीब जनतेला या योजनांचा लाभ नक्की भेटणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची शिफारस रदद करावी अशी मागणी बाबाजी पवळे यांनी केली होती.
महिला व बालकल्याण/समाज कल्याण/कृषी विभागामार्फत १०% व १५% टक्के निधीमधून वैयक्तिक लाभांच्या योजनेमध्ये जिल्हा परिषद व पचांयत समिती सदस्यांच्या शिफारसी रदद करण्यात याव्यात. आणि लाभ दिलेल्या योजनांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक आणि माहिती अधीकार कार्यकर्ते बाबाजी शांताराम पवळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद यांच्याकडे एका तक्रारी अर्जान्वये केली होती.
महिला व बालकल्याण/समाज कल्याण/कृषी विभागामार्फत १०% व १५% टक्के निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून पिठ गिरणी, पिको फाॅल मशिन, सौर कंदिल, मसाला कांडप मशिन, केश कर्तनालयासाठी खुर्ची व शेतीसाठी लागणारी औजारे देण्यात येत होत्या.
वरिल योजने मध्ये अर्जामधील शिफारस प्रमाणपत्रा द्वारे जिल्हा परिषद व पचांयत समिती सदस्यांकडून अपात्र व आपल्या मर्जीतील लाभार्थीनां लाभ दिला जात होता. त्यामुळे पात्र लाभार्थी सदर योजनेपासून वंचित रहात आसल्याचा आरोप पवळे यांनी केला होता. त्यामुळे वरिल वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी जिल्हा परिषद व पचांयत समिती सदस्यांची शिफारस असलेली अट तात्काळ रदद करणेत यावी अशी मागणी पवळे यांनी आपल्या तक्रारी अर्जामध्ये केली होती.बाबाजी पवळे यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील खर्या गोरगरीब लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
