ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य करणार-उमेश सासवडकर

पंढरपूर (प्रतिनिधी):- आगामी काळात ग्रामीण भागातून पंढरपूरला शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना मदत व सहकार्य करु असे आश्‍वासन सामाजिक कार्यकर्ते उमेश सासवडकर यांनी दिले. भाळवणी, ता.पंढरपूर  येथील साईनाथ कॉम्प्युटर्स च्या वतीने आयोजित केलेल्या ‘शुभचिंतन सोहळा आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आजतागायत एक विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना अनेकदा मदत करण्याचा योग आला आहे. याच मदतीमध्ये कधीही खंड पडणार नाही. याची मी माझ्या परीने दक्षता घेणार आहे.

यावेळी साईनाथ कॉम्प्युटर्स चे राहुल ताठे, नितीन आसबे, प्रशांत माळवदे, समाधान गाजरे, नेहला शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियांका मदने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा गवळी यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *