पंढरपूर (भगवान वानखेडे):- पंढरपूर बसस्थानकावर प्रवाशांचे ‘हाल’ होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधीत अधिकार्यांनी येथील असुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपूरच्या नव्या बसस्थानकावरील प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. दैनिक दामाजी एक्सप्रेस ने वारंवार पंढरपूर बसस्थानकावरील विविध समस्यांबाबत वृत्त प्रसिध्द करुन येथील समस्यांकडे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचे ‘लक्ष’ वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘असुविधांचे माहेरघर बनले पंढरपूरचे नविन बसस्थानक’ या मथळ्याखाली दैनिक दामाजी एक्सप्रेस ने प्रसिध्द केलेल्या वृत्तामध्ये येथील विविध प्रश्नांबाबत सविस्तर माहिती दिली होती. मात्र यानंतरही अधिकार्यांनी येथील प्रश्न सोडविण्यासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.
पावसाळ्यापूर्वीच येथील ङ्गलाटावरील डांबरीकरण होणे आवश्यक होते. याबाबतही आम्ही प्रसिध्द केलेल्या वृत्तामध्ये उहापोह केलेला होता. मात्र या वृत्ताकडे कानाडोळा करणार्या अधिकार्यांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयेतमुळे सध्या पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रवाशांसह दैनंदीन कामकाजासाठी दररोज बाहेरगावी जाणार्या पंढरपूरकरांना व वारकर्यांना बसस्थानक आवारातून ङ्गिरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसस्थानकासमोरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने ङ्गलाटाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अबालवृध्दांंना व महिलांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. महामंडळाच्या संबंधीत अधिकार्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आपली जबाबदारी समजुन किमान येथील ङ्गलाटावरील खड्डे बुजवून याची दुरुस्ती त्वरीत करण्यासाठी योग्य ती पावले त्वरीत उचलावीत अशी मागणी प्रवाशी, वारकरी व नागरिकांमधून होत आहे.
Posted inPandharpur Live News

