![]()
पंढरपूर (प्रतिनिधी):- अकलुज लगत असलेल्या माळीनगर येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज सकाळी 9.00 च्या सुमारास मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. अकलुज येथील रात्रीचा मुक्काम आटोपून सकाळी लवकरच संत तुकाराम महाराजांची पालखी माळीनगर येथे दाखल झाली. या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्याच्या समोरील प्रांगणात हे उभे रिंगण मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. अश्वाने धावत दौड पुर्ण केल्यानंतर उपस्थित भाविकांनी माऊली-माऊलीच्या जयघोष केला. हा रिंगण सोहळा यशस्विरित्या पार पाडण्यासाठी डेप्युटी इन्सिडंट कमांडर गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तसेच संस्थानचे अध्यक्ष नारायण महाराज, पालखी सोहळा प्रमुख अशोक मोरे, अभिजित मोरे महाराज, बापूसाहेब मोरे महाराज, जालींदर विश्वजीत मोरे महाराज, सुनिल मोरे महाराज यांच्यासह सबंधीतअधिकारी, कर्मचारी, भाविक, माळीनगर व पंचक्रोशीतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


