![]()
पंढरपूर दि. 11 – खुडुस येथे माऊलींचे जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण सकाळी 8.45 च्या सुमारास मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. माळशिरस येथील रात्रीचा मुक्काम आटोपुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी खुडूसच्या दिशने आज सकाळी लवकर निघाली. साधारणत: 8.15 वाजता पालखी खुडुस येथे दाखल झाली.
खुडुस येथे माऊलींचे जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण सकाळी 8.45 च्या सुमारास मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. या प्रसंगी अश्वांनी गोल रिंगण फेरी पुर्ण करताच उपस्थित वारक-यांच्या मुखाव्दारे माऊली-माऊली चा जयघोष मोठ्या प्रमाणावर निघाला. हा सोहळा यशस्वी रित्या संपन्न होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यावेळी तहसिलदार वर्षाराणी भोसले, गटविकास अधिकारी एस.जे.पाटील, सरपंच रंजना ठवरे यांच्यासह सबंधीत अधिकारी-कर्मचारी, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.


