पंढरपूर (प्रतिनिधी):- माझा भाव। तुझे चरणी॥ तुझे रुप। माझे नयनी॥ या संतवचनाची आठवण करुन देणार्या वारकरी भाविकांचा भक्तीचा मेळा आज पंढरीत भरलेला असून आषाढ शुध्द एकादशीची ही यावर्षीची यात्रा म्हणजेच सकल वैष्णवांचा मेळा आज पंढरीत दाखल झाला आहे. पंढरीत लाखो भाविकांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेतले.
तब्बल 48 तास दर्शनरांगेत उभे राहून पांडुरंगाच्या दर्शनासाठी अधीर झालेले भाविक-भक्त तहान-भुक हरपून मुखाने विठु-माऊलीचा जयघोष करताना आढळत आहेत. अवघी पंढरी टाळ-मृदंगाच्या निनादात, अबीर बुक्क्याच्या उधळणीत व विठुनामाच्या जयघोषाणे निनादून गेलेली आहे.
दिंड्या पताका घेऊन मुखाने रामकृष्ण हरी चा गजर करणारे वारकरी पंढरीच्या विविध भागात भागवत धर्माची पताका ङ्गडकावताना आढळत आहेत. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचि दान। अशा शब्दात मौलिक जगत्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्या चंद्रभागेच्या स्नानाची महती वर्णन केली आहे. त्या चंद्रभागेचे दोन्ही तीर वारकर्यांच्या गर्दीने ङ्गुललेले आहेत. याची देही याची डोळा ज्यांना पंढरीतील हा नयनरम्य भव्य सोहळा पहाता व अनुभवता येतोय ते सारेच धन्य होय!
Posted inPandharpur Live News
