पंढपूरमध्ये आल्यानंतर आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा व पांडुरंगाचे दर्शन, रात्रभर भजन-किर्तन व हरिनामाचा जागर या सर्व गोष्टीला भागवत धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्वाचे वर्णन केले आहे. त्यानुसार वरील सर्व कर्मे वारकरी भाविक-भक्त निष्ठापुर्वक पार पाडत असतात. अवघा पंढरपूर परिसर काल रात्री आषाढी एकादशीच्या रात्री विठोबा रखुमाईच्या व विविध संतांच्या नामघोषाने, टाळ-विणा-मृदंगाच्या निनादाणे दुमदुमला होता. याच दिवशी लाखो भाविक-भक्तांसोबत पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनीही आपल्या पत्रकार मित्रांसोबत श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
यावेळी प्रसाद कुलकर्णी, राजेंद्र कोरके-पाटील, सागर कदम आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
(सर्व छायाचित्रे-मंदार मंगसुळकर)
Posted inPandharpur Live News
पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांचे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन
पंढरपूर लाईव्ह वृत्त:-




