डाॅक्टरला २० लाखाची खंडणी मागणारे पंढरीतील तोतया पत्रकारास अन्य ५ ठगसेनांचे टोळके शहर पोलिसांनी केले गजाआड..
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी ): एका डॉक्टरकडे २० लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन शहर पोलिसांनी एका तोतया पत्रकारासह अन्य ५ ठगसेनांना अटक केली आहे .
दिनांक ४ सप्टेंबर २०१६ रोजी घडलेल्या
या गुन्याची दखल डीवायएसपी निखील पिंगळे यांनी तात्काळ घेऊन राञी उशीरपर्यंत शहर पोलिस ठाण्या थांबुन चौकशी केली.
शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सपोनि खाडे आदींनी पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून या आरोपींची कसुन चौकशी सुरू आहे.
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, येथील इसबावी भागात डॉ. अतुल विलास हावळे (वय 40 रा. भंडीशेगाव ता. पंढरपूर) यांचे माऊली हॉस्पिटल आहे.
रविवारी (ता.4) आरोपी दिपक उत्तम थोरात (मानवाधिकार संघटनेचा स्वघोषीत साहेब) (रा. माऊली नगर, पंढरपूर), प्रशांत विठ्ठल कुलकर्णी (तोतया पञकार) (रा. भडगावकर राम मंदिर, विजापूर गल्ली, पंढरपूर), मंदार श्रीकांत मंगसुळकर (रा. हरिदास वेस, पंढरपूर), बालाजी चव्हाण (रा. कॉलेज चौक, पंढरपूर), सागर माने (रा. वाखरी ता.पंढरपूर) आणि सुनील हरिदास बोराडे (रा. इसबावी, पंढरपूर) हे डॉ. हावळे यांच्या माऊली हॉस्पिटल मध्ये गेले.
आरोपी दीपक थोरात याने आपण महाराष्ट्राचा मानवाधिकार संघटनेचा मुंबई येथील मुख्य साहेब आहे. तुमच्या बद्दल माझ्याकडे ब-याच तक्रारी आलेल्या आहेत. त्याची फाईल माझ्याकडे आहे. आम्ही तुमची व तुमच्या दवाखान्याची मिडिया मार्फत बदनामी करु अशी धमकी देऊन सर्व आरोपींनी फिर्यादी डॉ. हावळे यांच्याकडे 20 लाख रुपये रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास फिर्यादीस जीवे ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीकडून 5 लाख रुपयांचा येथील आयसीआयसीआय बँकेचा बेरर चेक घेतला व एक लाख रुपये फिर्यादीची पत्नी डॉ.सुषमा ही घेऊन येई पर्यत फिर्यादीस आरोपींनी त्यांच्याकडील मोटार (क्र. एम एच 14- डी ए 5000) मध्ये जबरदस्तीने बसवून पंढरपूर शहरात घेऊन गेले.
या प्रकरणी डॉ. हावळे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी आरोपींच्या विरुध्द भादंवि कलम ३४२, ३६५, ३८४, ३८६, ५०६, ३४ अन्वये
गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि खाडे हे करीत आहेत.
