पंढरपूर (प्रतिनिधी):- दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या पंढरपूर विभागीय कार्यालयात विघनहर्त्या श्रीगणेशाची प्राणपतिष्ठापणा करण्यात आली. आज पहिल्या दिवशीची श्री ची पुजा व आरती दैनिक लोकमतचे पत्रकार विठ्ठल कवडे दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पंढरपूर विभागप्रमुख भगवान वानखेडे यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी पत्रकार राजाभाऊ शहापूरकर, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब महाडीक, छावा चे शहराध्यक्ष सागरदादा कदम, शहर संघटक सागर चव्हाण, शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे, भाजपाचे जिल्हा चिटणीस दत्तासिंह रजपुत, छावा वि.आघाडीचे प.महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता काळे, छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकी झेंड, अमोल सगर व दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयीन कर्मचारी महेश वाघमारे यांचेसह अनेकजण उपस्थित होते.
Posted inPandharpur Live News

