पंढरपुर / प्रतिनिधीविश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था आणि पंढरपुर पत्रकार यांच्या वतीने प्रतिवार्षि दिला जाणाऱ्या कै . पांडुरंग तात्या घलसासी जेष्ठ पत्रकार पुरस्कार आणि कै . अमित ओहाळ युवा प्रतिभा पत्रकार पुरस्कार साठी इछुकांनी प्रस्ताव २० सप्टेम्बर पर्यंत पाठवावेत असे आवाहन अभिराज उबाले यानी केले आहे .
गेल्या 3 वर्षापासून पंढरपुरकरांच्या वतीने जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार आणि तरुण पत्रकरास पुरस्कार मोठ्या समारंभकपूर्वक दिले जातात . सन्मानचिन्ह , रोख रक्कम शाल श्रीफल असे पुरस्काराचे स्वरुप आहे . आज पर्यंत या पुरस्काराचे श्री अतुल बडवे , सतीश सावंत , प्रमोद बोडके , श्रीकांत साबळे , विजयकुमार सोनवणे , सम्मेद शहा , समाधान फुगारे आदी मानकरी ठरले आहेत .
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा हा सप्टेम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून यासाठी जिल्ह्यातील इछुक पत्रकारानी आपली संपूर्ण माहिती तसेच गत वर्षातील बातम्यांची कात्रणे असा संपूर्ण प्रस्ताव 20 सप्टेम्बर पर्यंतabhiraj.ubale@gmail.com किंवाsanketkulkarni1101@gmail. comआशा दोन्ही ईमेल आयडी वर पाठवून द्यावेत असे देखिल आवाहन यावेळी संयोजक यांच्याकडून करण्यात आले आहे .


