पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील नवीपेठ परिसरात असलेले गांधी मोबाईल शॉपी हे दुकान काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आगीच्या भक्षस्थानी पडले. यामुळे 50 लाखांहून अधिक रुपये चे नुकसान झाले असल्याची प्रारंभीक माहिती मिळते. अग्निशमन दलाच्या जवानानंनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली त्यामुळे इतर शेजारील दुकानांना या आगीमुची झळ पोहचिली नाही.
शहरातील मध्यवर्ती भागात असणार्या नवीपेठेतील गांधी मोबाईल शॉपी या दुकानातील सर्व मुद्देमाल या आगीत जळून खाक झाला आहे. या दुकानाचे मालक जवाहर देवचंद गांधी हे या दुकानाच्या वरच्या मजल्यावरच राहतात. परंतु घरातील एसीमुळे त्यांना बाहेर लागलेल्या आगीबद्दल लवकर समजले नाही. ज्यावेळी त्यांच्या घराच्या खिडकीची काच आागीच्या झळांनी फुटली त्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने त्यांना जाग आली. शेजारपाजारचे लोक जागे झाले. अग्निशमन दलाची गाडी लवकर आली.
या दुकानातील चार लोखंडी कपाट, फर्निचर, टेबल, एसी, 2 प्रिंटर, सॅमसंग, मायक्रोमॅक्स, लिनोनी, सोनी, एचटीसी, कार्बन, पॅनासॉनीक, आसुस, मोटोजी, वगैरे मोबाईल्सचे हॅन्डसेट बॉक्ससह जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीच्या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोसई गबाले हे करीत याचा पुढील

