पंढरपूर नगरपरिषद मतदान प्रक्रिया सम्पन्न… दुपारी ५ वाजेपर्यंत सरासरी 7०% मतदान

           

 पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली.  दुपारी अडीच-तीन वाजण्याच्या  दरम्यान काही प्रभागात ३०% मतदान झालेले आढळले.  पंढरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात वाजता सुरू झाली.   दुपारी ४ नंतर मतदारांची गर्दी वाढू लागली. सरासरी सर्वच प्रभागातील  बुथवर  सकाळी  शांतता होती दुपारनंतर मात्र मतदारांची गर्दी वाढू लागलेली आढळून येत होती.
                 दुपारी अडीच-तीन वाजण्याच्या  दरम्यान काही प्रभागात ३०% मतदान झालेले आढळले तर काही बुथवर हा आकडा ५०% च्या घरात गेलेला आढळला. प्रभाग ८ मध्ये  काही बुथवर दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान फक्त सरासरी २५ % च्या आसपास मतदान झालेले होते. प्रभाग क्रमांक ८ साठीचे काही बूथ हे येथील उर्दू शाळा येथे होते. या ठिकाणी दुपारी सव्वा चार वाजता मोठ्या संखेने मतदार रांग  लाऊन उभे असल्याचे चित्र होते. या बुथवर मतदान प्रक्रिया चालू असताना एका उमेदवाने बूथमध्ये प्रवेश केल्याने काहीसा गोंधळ उडालेला आढळला.
                शहरातील संपूर्ण प्रभाग मिळून दुपारी साडेतीन वाजता ४९.०२ %  एवढे मतदान झालेले होते. यावेळी  एकूण १९६९६ पुरुष मतदारांनी तर एकूण १८६८४ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .  दुपारी ५  पर्यंत  सरासरी सर्वत्रच ७०% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *