![]()
पंढरपूर (प्रतिनिधी)ः- पंढरपूरच्या मतदारांनी सौ. साधना नागेश भोसले यांच्या बाजुने कौल दिला आहे. तब्बल 3834 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी पुन्हा साधनाताई विराजमान झाल्या आहेत.
बरीच उत्सुकता लागुन असलेल्या या निवडणूकीचा निकाल आज निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी जाहीर केला. सकाळी 10 वाजता येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी चालु होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे..
कोळी शिवाजी 2344, देवधर मुकूंद 3077, नेहतराव संतोष 16920, पाटील युवराज 3904, बोराळकर बबलु 180, भिंगे संतोष 638, भोसले साधना नागेश 20754, मुलाणी अब्दुल 268, रोंगे बब्रुवाहन 4934, वाघमारे नाना 988, शिंदे सुरेश 846, वरीलपैकी कोणीही नाही (नोटा) 302
3834 मतांनी सौ. साधना नागेश भोसले या विजयी झाल्या आहेत.
