स्वेरीत शहीद मेजर कुणाल गोसावी यांना वाहिली श्रद्धांजली

पंढरपूर- पंढरपुरचे सुपुत्र मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी हे जम्मू-काश्मीर येथे नागरोटा सांबा सेक्टरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतंकवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यामुळे श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूरमध्ये श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी  प्रा. अमृत पवार यांनी  मेजर कुणाल मुन्नागीरगोसावी यांच्या दुर्दैवी घटनेबाबत  सविस्तर माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ, अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे, डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजिनीअरिंगचे प्राचार्य प्रा. ए.डी.इंगळे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.पी.एस.कचरे,डॉ.अभय उत्पात, वसतिगृह अधिक्षक प्रा. एम.एम.पवार, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी दहशतवादी संघटनेचा निषेध करून शहीद मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली वाहिली.
छायाचित्र – श्रद्धांजली वाहताना स्वेरीतील प्राध्यापक वर्ग

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *