शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार दुपारी पंढरपूर ते वाखरी पर्यंत निघेल अंत्ययात्रा…

Loading


       



         पंढरपूर (प्रतिनिधी):- जम्मू काश्मीर मधील नगरोटा सांबा सेक्टर येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पंढरपूरचे वीर सुपूत्र मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांच्यावर त्यांच्या वाखरी येथील गोसावी मळा येथे आज गुरूवार दि. 1 डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

            मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव गुरुवार दि. 1 डिसेंबर रोजी पंढरपूरमध्ये आणले जाईल.  वाखरी येथे गोसावी कुटूंबियांची शेती असून गोसावी मळा येथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी  येथील त्यांच्या 12 एकर शेतजमिनीवरचे उभे पीक काढुन टाकण्यात आले आहे.

                 गुरूवार दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता दाळे गल्लीतील गोसावी यांचे निवासस्थानी पंढरपूरकरांच्या नागरीकांना अंत्यदर्शनासाठी शहिद कुणाल गोसावी यांचे पार्थिव ठेवणेत येणार आहे. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा श्री.गोसावी यांचे घरापासून अर्बन बँक-नाथ चौक- प्रदक्षिणा मार्ग-शिवाजी चौक-सावरकर चौक-एसटी स्टॅन्डपासून-इंदिरा गांधी चौक मार्गे-इसबावी- वाखरी पर्यंत निघेल. येथील श्री.गोसावी मळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहिद गोसावी यांच्या वाखरीतील शेतावरती दुपारी ठिक 4.00 वाजता  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. यावेळी त्यांना लष्करी पध्दतीने मानवंदना (र्ॠीरीवेष हेर्पेीी) दिली जाणार आहे.

               सोलापूर जिल्ह्याच्या या सुपुत्राचा अंत्यविधी व्यवस्थेची पाहणी आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.विजयकुमार देशमुख व आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी यांचे समवेत केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *