रायगडवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील अर्धी तलवार गायब पुरातत्व खात्या विरोधात शिवप्रेमींत तीव्र संताप : अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल

रायगडवरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील अर्धी तलवार गायब पुरातत्व खात्या विरोधात शिवप्रेमींत तीव्र संताप : अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल

किल्ले रायगड ( महाड ):-  दि १०महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी महाराष्ट्राच मानबिंदू किल्ले रायगडावर राजदरबारात मेघडंबरी मध्ये सन्मानाने बसविण्यात आलेल्या पुतळ्यामधील आर्धी तलवार आश्चर्यकारकरित्या गायब झाल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. तर या घटनेमुळे पुरातत्व खात्या विरोधात शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटने विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या संतापजनक घटनेची माहिती अशी की किल्ले रायगडावर ज्या ठिकाणी छापती शिवाजी महाराज यांच्यावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्या राजदरबारातील मेघडंबरीमधील २००९ साली कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांनी ब्रांज धातूपासून खास बनविलेला पूर्णाकृती पुतळा विधीवतपणे स्थापन केला होता. मात्र हा पुतळा बसविण्यास त्यावेळी पुरातत्व विभागाने परवानगी नाकारल्या नंतरही लाखो शिवभक्तांनी उत्फुर्तपणे सहभाग घेवून रायगडावर मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानी त्याठिकाणी बसविला होता. शनिवारी दि १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजणेचे सुमारास महाराजांच्या पूजेसाठी गेलेल्या एका शिवप्रेमीला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामधील तलवारीचा अर्धा तुकडा गायब झाला असल्याचे लक्षात आले.

या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली. ही तलवार बनवितांना ती सर्व वातावरणात टिकावी याची पूर्ण काळजी घेतलेली दिसते.  संपूर्ण तांबा धातूचा वापर करून हा शिवपुतळा घडविण्यात आला होता यापैकी जवळपास सव्वा ते दिड फुट इतकी तलवार गायब झाल्याने याबाबत संशय निर्माण झाला आहे.

ही तलवार सहजगत्या तुटणे किंवा पडून जाणे शक्य नसल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा आज पहावयास मिळून तलवार चोरीलाही गेली असावी असा संशय बळावत आहे. तर पुरातत्व खात्या विरोधात शिवप्रेमीत असणाऱ्या संतापात या घटनेमुळे भरच पडली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *