पंढरपूर अर्बन आयोजित कै.बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे पुष्पदुसरे… संवादासाठी देहबोली हे प्रभावी माध्यम- डॉ. विश्‍वास मेहंदळे

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर तर्फे सहकार सप्ताहनिमित्त आयोजित देशभक्त कै.बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. विश्‍वास मेहंदळे, पुणे यांनी देहबोली ते उपग्रहबोली या विषयावर गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भागवताचार्य ह.भ.प.वा.ना.उत्पात होते.

कार्यक्रमाचे दुसरे पुष्प गुंफताना डॉ. विश्‍वास मेहंदळे म्हणाले की, संवाद, संवाद कौशल्य, संवादशास्त्र यांचा देहबोलीपासून सुरू झालेला प्रवास उपग्रहबोलीपर्यंत कसा आला, माध्यमांची एवढी प्रगती होवुनही आज घरे मुकी होताना का दिसतात, याचा प्रवास त्यांनी आपल्या व्याख्यानातुन उलगडला. माहिती, मनोरंजन व लोकशिक्षण याचे समन्वय साधणारा देहबोली ते उपग्रहबोली कार्यक्रम सादर करताना ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र अशी देहबोली असते, आपली देहबोली इतरांवर प्रभाव टाकतेे, पण इतरांच्या देहबोलीचा आपल्यावरही प्रभाव पडला तो पुर्वीच्या काळी श्री.यशवंतराव चव्हाण, श्री.वसंतराव नाईक, श्री.अटलबिहारी वाजपेयी, श्री.बाळासाहेब ठ।करे, श्री.प्र.के.अत्रे यांच्यासारख्या मोठ।्या व्यक्तीमत्वाची स्वतंत्र अशी देहबोली होती. स्वत:च्या देहबोलीने ते ओळखले जायचे. शब्द हेच माध्यम मानुन प्रत्येक व्यक्तीशी हितगुज साधता येणे शक्य होते. आपण शब्दांनी जगाशी संवाद साधत असलो तरी आपले संपुर्ण अस्तित्वच बोलत असते, यामुळे अगदी अनोळखी भाषा बोलणारेही खाणाखुणांनी विशिष्ठ प्रकारच्या देहबोलीने सहज संवाद साधु शकतात.

काळानुरूप तंत्रज्ञान आले परंतु, चॅटींग कल्चर मध्ये टॉकींग रिलेशनस् हरवत चालले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल, दुरदर्शन, केबल, इंटरनेट याचा वापर वाढु लागला. उपग्रहबोली आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनली आहे. हल्ली इंटरनेट, दुरदर्शनवर समाजहिताची, समाजप्रबोधनाची माहिती कमी प्रमाणात मिळते मात्र चंगळवादी, बेचव चर्चा जास्त पहावास मिळते. उपग्रहबोलीच्या अतिरेकाने माणसांमधील संवाद हरवत चालला असून त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. उपग्रहबोलीच्या माणसाची जीवनशैलीच बदलली, संवाद कमी झाला, नाती दुरावत गेली. देहबोलीतुन होणारा संवाद हा माणसाला चिरंतनकाळ आनंद देणारा आहे. नाती जपणारा व जोड।सीं;णारा आहे, असे ही यावेळी ते म्हणाले.

गाणी, नकला किस्से विविध घट।सीं;नांची पार्श्‍वभुमी, प्रसार माध्यम क्षेत्रात करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन डॉ. विश्‍वास मेहंदळे, भागवताचार्य ह.भ.प.वा.ना.उत्पात व बँकेचे व्हा.चेअरमन श्री.दीपक शेटेे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बँकेचे संचालक उदय उत्पात यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख व आभार शांताराम कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी बँकेचे कुटुंब प्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक, विणाताई जोशी, वामनराव माने सर, दिनकरभाऊ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संचालक रजनीश कवठेेकर, उदय उत्पात, चंद्रकांत निकते, पांडु।सीं;रंग घंट।सीं;ी, सतीश मुळे, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, रेखाताई अभंगराव, माधुरीताई जोशी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, तज्ञ संचालक राजेंद्र बजाज व अ‍ॅड. भालचंद्र कुलकर्णी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *