![]()
पंढरपूर- पंढरपुरातील गोपाळपूरनजीकच्या माळरानावर असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राबवित असलेले प्रत्येक उपक्रम स्तुत्य तर असतातच परंतु त्यांच्या विधायक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यवर्धक उपक्रमांचे अनुकरण इतर महाविद्यालयांनी देखील करावे असे असतात म्हणूनच विद्यार्थ्यांसह पालक आपल्या पाल्याचा स्वेरी महाविद्यालयात कसा नंबर लागेल? यासाठी प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी तेथील प्राध्यापक वर्ग अहोरात्र कार्यरत असतात. म्हणूनच स्वेरीची गणना आज महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या महाविद्यालयात होत आहे.’ असे प्रतिपादन खेड भाळवणी सामाजिक
कार्यकर्ते डॉ. दत्तात्रय साळुंखे यांनी व्यक्त केले.
सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या राष्टीय सेवा योजना व श्री विठ्ठल एजुकेशन व रिसर्च
इन्स्टिट्यूट पंढरपूर संचालित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या संयुक्त विद्यमाने मौजे खेड
भाळवणी (ता. पंढरपूर) येथे मागील आठवड्यात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
करण्यात आलेहोते. या शिबिराअंतर्गत खेड भाळवणी गावात विशेष स्वच्छता मोहीम हाती
घेण्यात आली होती.याच्या उदघाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ.साळुंखे बोलत होते.इतकी
थंडी असूनही स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे ग्रामस्थ देखील सोबत
सामाजिक सेवा म्हणून मदतीला धावले. या शिबिराअंतर्गत गावात आरोग्यविषय जनजागृती
करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतीलस्वयंसेवकानी परिश्रम घेतले. गावातील मंदिर परिसर,
रस्ते, समाज मंदिरे, दवाखाने, कचराकुंड याची स्वच्छता केली गेली. या श्रमसंस्कार शिबिर
काळामध्ये राजीव गांधी मानव विकास व संशोधन विभाग, पंढरपूर येथील संशोधकानी
शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर राबवून माती परीक्षणाचे महत्व पटवून दिले. आरोग्य व रक्त
तपासणी शिबीर, वृक्षारोपण आदी शिबीर राबविले. या सात दिवसाच्या शिबिर कालावधीत
प्रा. विक्रम मगर, प्रा. विक्रम बिस्किटे, अभिनेते शाम सावजी, डॉ. अश्विनी साळुंखे, डॉ. बापू
राऊत, देवा चव्हाण आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरात प्राचार्य डॉ.
बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व रा.से.यो.चे समन्वयक प्रा.ए.जी.कोरके, प्रा.पी.डी.
बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील जवळपास 95 विद्यार्थी व विद्यार्थिनी
स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यांच्या कामातील उत्साह पाहून गावातील लोकानी सहभाग
घेतला. त्यामुळे उत्साह आणखीच वाढत गेला. या शिबिराचा समारोप खेड भाळवणी
ग्रामपंचायतीच्या वतीने सहभागी स्वयंसेवकाना पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या सात
दिवसाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी श्री विठ्ठल एजुकेशन व रिसर्च इन्स्टिट्यूटचे
संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, उपप्राचार्य प्रा.एन.डी.मिसाळ, पंढरपूर विभागाच्या रासेयो
अधिकारी एफ.एस. विजापूरे यांचे मार्गदर्शन लाभले तर स्वेरीच्या विद्यार्थ्यांना तब्बल सात
दिवस सहकार्य केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्रचार डॉ. बी.पी.रोंगे यांनी खेड
भाळवणी ग्रामस्थांचे आभार मानले. हेशिबिर यशस्वी होण्यासाठी गावच्या चंद्रभागा सह.
साखर कारखान्याचे संचालक बिभीषण पवार, सरपंच सौ शालन मस्के, उपसरपंच शरद
पवार, सत्यवान साळुंखे, डॉ. दत्तात्रय साळुंखे, शहाजी पवार, नानासाहेब घालमे, नवनाथ
पवार, मचिंद्र पवार, प्रा.राजेंद्र पवार व ग्रामस्थांनी सहकार्य केले. या शिबिरासाठी प्रा.
सचिन गवळी, प्रा. यशपाल खेडकर, प्रा. एस.एस. गायकवाड, प्रा. यू. व्ही.बावकर, प्रा.
पी.एच.पाटील, प्रा.आर. बी. कागदे, प्रा. डी.एस.घोडके, प्रा. महुवा बिस्वास, रा.से.यो.चे
विद्यार्थी सचिव अक्षय इंगवले, प्रमोद पाटील यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.स्वेरीच्या
विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे ग्राम स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरणा मिळाली.
प्रथमेश चौधरी व ऋषीकेश एकतपुरे यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटच्या दिवशी आभार प्रा.
पी.डी. बनसोडे व प्रमोद पाटील यांनी मानले.
छायाचित्र- खेडभाळवणी (ता.पंढरपूर)मध्ये स्वेरी इंजिनीआरिंग कॉलेज व सोलापूर
विद्यापिठ अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान करताना
विद्यार्थी.


