अभाविपच्या विरोधात पंढरीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

पंढरपूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात मोहिम छेडणार्‍या   गुरमेहर कौरला बलात्काराची धमकी देणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पंढरीत निषेध  करण्यात आला. विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्याकरीता असते. परंतु अभाविपने प्रश्‍न सोडवण्याऐवजी विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरविण्याचे काम भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सुरु केले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी हिताचे एकही काम केले नाही. या उलट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधात आवाज उठवणार्‍या गुरमेहर कौरला बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देण्याची भाषा वापरली जात आहे.  अशा प्रकारे विद्यार्थ्यांना धमकावण्याचे काम जर अभाविपकडून होत असेल तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कदापी शांत बसणार नाही. विद्यार्थी हितासाठी राष्ट्रवादी काँगे्रसपार्टी सतत विद्यार्थ्यांच्या हिताचे  निर्णय घेत आलेली आहे व यापुढेही घेत राहिल. 
अभाविप व भाजपाने विद्यार्थी चळवळ मोडीत काढण्याचा डाव आखला आहे. हा त्यांचा डाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस कदापी यशस्वी होऊ देणार नाही. याउलट अभाविपवर बंदीच्या मागणी करीता राज्यव्यापी आंदोलन राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रसच्यावतीने छेडण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, गणेश बनसोडे, संकेत घोगरदरे, अविनाश मोरे, फैजल इनामदार, अभिजीत साळुंखे, सागर पडवळ, गौस करमाळकर, गजानन ननवरे, माऊली साबळे, सतोष ठिगळे, विघ्नेष मिठारी, जावेद शेख, ओंकार वैरागकर, दत्ता माने, राकेश बोरकडे, सुरज कांबळे, दिपक बनसोडे, आरीफ शेख, तिरुपती गवळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Attachments area

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *