नाथषष्ठी यात्रेची कालाहंडी उत्सवाने सांगता

नाथषष्ठी यात्रेची कालाहंडी उत्सवाने सांगता

औरंगाबाद : पैठण येथे संत एकनाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त सुरु झालेल्या यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात सोमवार दि.२० मार्च रोजी सायंकाळी कालाहंडी उत्सवाने करण्यात आली. 

नाथवंशज रावसाहेब महाराज यांच्या हस्ते नाथमंदिराच्या प्रांगणात कालाहंडी फोडण्यात आली.

यावेळी रघुनाथबुवा गोसावी, हरीप्रसाद पंडीत, पुष्कर महाराज गोसावी यांच्या पालखींची प्रामुख्याने उपस्थिती होती. दि. १८ मार्चपासून सुरु झालेल्या यात्रेचा समाप्ती सोहळा भानुदास एकनाथ या नाम गजराच्या भक्ति जल्लोषात कालाहंडी उत्सवाने संपन्न झाला. मंदिर परिसरात काला उत्सवात सहभागी होण्यासाठी आबालवृद्धांसह महिला भाविकांनी उस्त्फूर्त गर्दी केलेली होती.

विविध भागातून आलेल्या भाविकांसह यावेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल सुर्यवंशी, तहसीलदार राजीव शिंदे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी मान्यवर उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *