आमदार बाबाजानी दुर्रानीच्या प्रयत्नाला यश, तारुगव्हाणच्या बंधा-याला 30 कोटींचा निधी मंजूर

आमदार बाबाजानी दुर्रानीच्या प्रयत्नाला यश, तारुगव्हाणच्या बंधा-याला 30 कोटींचा निधी मंजूर

परभणी – पाथरी तालुक्यातील तारुगव्हांन बंधाऱ्याच्या रखडलेल्या कामासाठी येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी आ बाबाजानी दुर्रानी यांनी जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांच्या कडे 15 दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष भेटून केली होती, त्या मागणीची दखल घेत शासनाने आजच्या अर्थसंकल्पात 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आघाडी शासनाच्या काळात पाथरी तालुक्यातील तारुगव्हांन बंधाऱ्याची मंजुरी मिळाली होती, परंतु त्या नंतर निधी न मिळाल्याने ते काम रखडले होते, परिणामी त्या परिसरातील शेतकऱ्यांना बागायती उत्पन्ना अभावी आर्थिक प्रगती पासून वंचित राहावे लागत होते, त्यांच्या प्रगती साठी बंधाऱ्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे, असा तारांकित प्रश्न आ दुर्रानी यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता, तसेच 15 दिवसापूर्वी जलसंपदा मंत्री याना भेटून सर्व परिस्थिती व गरज सांगून  निधी मंजूर करण्याची विनंतीही केली होती, आ दुर्राणीच्या त्या सर्व पाठपुराव्या मूळे तारुगव्हांन बंधाऱ्यासाठी अर्थसंकल्पात 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत,                      लवकरच सदरील काम सुरु होईल, असे आ दुर्राणी यांनी  सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *