![]()
गायक संदीप शिंदे यांचे निधन
प्रतिनिधी । सोलापूर
भिम शाहीरीत वाघ समजले जाणारे सोलापूरचे गायक संगीतकार आणि गायक कवी संदिप शिंदे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी निधन झाले. सोलापूरचे कलारत्न पुरस्कार आणि राज्यातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी होते. त्यांनी प्रल्हाद शिंदे व भिम शाहीरीतील अनेक संगीतकार व गायकांसोबत काम केले होते. त्यांच्या विश्वदाभिरामा तथागत गौतम बुध्द या नाटकासह लोक कलेतील अनेक नाटकांना सांस्कृतिक कार्यक्रमांना संगीतबध्द त्यांनी केले होते. तर विश्वदाभिरामा आणितथागतगौतम बुध्द या नाटकांनी महाराष्ट्रात मोठे यश प्राप्त केले होते. तर त्यांनी रचलेल्या तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागल , हुंडा नको मामा फक्त पोरगी दया मला , हाताला धरलया म्हणती लगीन ठरलया या महाराष्टात प्रचंड प्रसिध्दी मिळविलेल्या गीतांनी त्यांची वेगळी ओळख करून दिली होती. तर १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरच्या आंबेडकरी कार्यक्रमांना त्यांचा मानाचा मुजरा असे. त्यांच्या पश्चात आई चार भाऊ पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज १ वाजता अंत्य संस्कार होणार आहेत. त्यांच्या साईहोम आदित्य नगर आर टी ओ ऑफीस या घरापासुन अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
