*वैराग येथील मटका आड्यावर धाड टाकून 68,000 रू मुद्देमाल मा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीम पोलिसांंनी जप्त केला*
————————————————
मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचे आदेशान्वये अवैध्य धंद्यावर कारवाई करणेकामी वैराग पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 23-3-2017 रोजी दुपारी 3-00 वा चे सुमारास मौजे वैराग येथील शिवाजी चौकातील टपरीवर चालत असलेल्या मटका आड्यावर धाड टाकून आरोपी 1) आनंद रामलिंग घोटकर 2) आकाश परमेश्वर काळे 3) प्रकाश परमेश्वर काळे 4) कृष्णा चंद्रमणी भालशंकर सर्व रा वैराग ता बार्शी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 68,000 रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर मटका मालकाबाबत चौकशी करीता त्याचे नाव सागर नवगण रा भवानी पेठ बार्शी असे असल्याचे सांगीतल्याने सर्व आरोपी विरुध्द वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि प्रकाश वाघमारे, पोना अमृत खेडकर, मिलिंद कांबळे, अंकूश मोरे, पो.कॉ प्रवीण पाटील, अभिजीत ठाणेकर, अमोल माने, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, नितीन चव्हाण, अमोल जाधव, पांडूरंग केंद्रे, महादेव लोंढे यांच्या टिमने हे काम केले आहे.*
Posted inCrime
