विश्व हिंदू परिषदेतर्फे हनुमान जयंती व महात्मा फुले जयंती साजरी
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 11 एप्रिल
येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने हनुमान जयंती व महात्मा फुले जयंती एकत्रित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी ठीक 6 वाजता हनुमान जन्म उत्सव साजरा करण्यात आला,गांधी रोडवरील तांबट धर्मशाळेजवळ असलेल्या .वि .हि. प .च्या हनुमान मंदिरामध्ये सकाळी वि .हि. प चे सामाजिक समरसता विभागाचे प्रांत प्रमुख रवींद्र साळे यांच्या हस्ते मूर्तिपूजन करण्यात येऊन मंत्रपुष्पांजली होऊन जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन विश्व हिंदू परिषदेचे रामेश्वर कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्
यानंतर उपस्थित असणार्या सर्व कार्यकर्त्यांना व भाविक भक्ताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री प्रवीण व्यवहारे ,शहर मंत्री प्रमोद बळवंतराव,पांडुरंग शिंदे एकनाथ तरल गट्टी ,महेश शिंदे ,सुभाष चव्हाण ,गणेश शिंदे,गणेश चव्हाण ,अरुण मोळक,गणेश मोळक,महेश खरात,सुनील मोळक ,शाम मोळक ,बाळू कोळेकर ,तर बजरंग दलाचे शहर संयोजक सुनील बाबर ,तर दुर्गवाहिनीच्या जिल्हा प्रमुख सौ भाग्यश्री लिहिणे,साक्षी कुलकर्णी,योजना कुलकर्णी ,तर मातृशक्तीच्या सौ,मालती गंभीर,मंगल माने,ज्योती अंबिके,रेखा टाकं,इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ,


