![]()
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम
सोलापूर दि. 22 :- महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुर्नवसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ , राज्यमंत्री दिलीप कांबळे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे
रविवार दि.23 एप्रिल 2017 रोजी पुणे येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह,सोलापूर येथे आगमन व मुक्काम. सकाळी 11.00 वा.पालकमंत्री विजय देशमुख यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थिती ( स्थळ- नवी पेठ, राजवाडे चौक, सोलापूर), दुपारी 12.00 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीत सहभाग ( स्थळ – पार्क चौक, सोलापूर), दुपारी 2.00 वा.सोलापूर येथून शासकीय वाहनाने तुळजापूर जि.उस्मानाबादकडे प्रयाण. सांय. सोईनुसार तुळजापूर .जि.उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने सोलापूर मार्गे पुणेकडे प्रयाण.

