![]()
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे शिवाजी मानकर व किशोर गांगुर्डे यांचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर व वरिष्ठ सहायक संचालक किशोर गांगुर्डे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी मानकर यांनी महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन, महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्र स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबरोबरच महासंचालनालयात अत्याधुनिक दृकश्राव्य रेकॉर्डिंग स्टुडिओ, माध्यम प्रतिसाद केंद्र आणि समाज माध्यम कक्षाची निर्मिती करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल नागरी सेवा दिनी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच महासंचालनालयात सोशल मीडियाचा स्वतंत्र कक्ष निर्माण करून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत ट्विटर, ब्लॉग, फेसबुक यासह व्हॉट्स अॅप बुलेटिन आणि 28 लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत शासनाचे उपक्रम,निर्णय पोहोचवणारी DGIPR NEWS नावाची SMS सेवा सुरू करण्यात श्री. गांगुर्डे यांचे मोलाचे योगदान आहे, त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

