नागरी सेवा दिन पारितोषिक वितरण समारंभ विविध खात्यांच्या अधिका-यांचा गौरव गतिमान व लोकाभिमुख प्रशासनासाठी सकारात्मकता जोपासावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी सेवा दिन पारितोषिक वितरण समारंभ विविध खात्यांच्या अधिका-यांचा गौरव
गतिमान व लोकाभिमुख प्रशासनासाठी सकारात्मकता जोपासावी–  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माहिती महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर
 व वरिष्ठ सहायक संचालक किशोर गांगुर्डे यांचाही गौरव
 मुंबईदि. 22 : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाला सकारात्मक विचारांची जोड देऊन प्रशासन पारदर्शकगतिमान आणि लोकाभिमुख करावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले.
            सह्याद्री अतिथीगृह येथे नागरी सेवा दिन समारंभ झालायावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारउद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाईखासदार अरविंद सावंतआमदार राज पुरोहित व मंगलप्रभात लोढामुख्य सचिव सुमित मल्लिक आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले कीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशात प्रशासकीय सेवेची मोठी फळी उभी केली आहे. ही प्रशासकीय यंत्रणा परिवर्तनाचे साधन बनली आहे. प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख करताना सामान्यांच्या जीवनात होत असलेले परिवर्तन आणि लोकशाहीसाठी आपण दिलेले योगदान याचे मूल्यमापन अधिकाऱ्यांनी सातत्याने करावे. प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत. सकारात्मकतेतूनच अडचणींवर मात करत विधायक कार्ये करता येते.
            पारदर्शक प्रशासनातूनच लोकहित जोपासता येईलअसे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणालेजोपर्यंत प्रशासनात पारदर्शकता येणार नाहीतोपर्यंत लोकांचे कल्याण होऊ शकणार नाही. पारदर्शकतेमुळे भ्रष्टाचाराचे निर्मूलन शक्य झाले आहे. प्रशासनात काम करताना काटेकोरपणे कर्तव्य बजावले तर ते देशाच्या विकासात भर पडते. जलयुक्त शिवारकृषीआपले सरकार सेवा या क्षेत्रांत राज्याचे महत्वपूर्ण काम झाल्याचे गौरवोद्‌गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे शिवाजी मानकर व किशोर गांगुर्डे यांचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांना प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर व वरिष्ठ सहायक संचालक  किशोर गांगुर्डे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी मानकर यांनी महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनमहाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्र स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबरोबरच महासंचालनालयात अत्याधुनिक दृकश्राव्य रेकॉर्डिंग स्टुडिओमाध्यम प्रतिसाद केंद्र आणि समाज माध्यम कक्षाची निर्मिती करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल नागरी सेवा दिनी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
           तसेच महासंचालनालयात सोशल मीडियाचा स्वतंत्र कक्ष निर्माण करून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत ट्व‍िटरब्लॉगफेसबुक यासह व्हॉट्स अॅप बुलेटिन आणि 28 लाखांपेक्षा अधिक लोकांपर्यंत शासनाचे उपक्रम,निर्णय पोहोचवणारी DGIPR NEWS नावाची SMS सेवा सुरू करण्यात  श्री. गांगुर्डे यांचे मोलाचे योगदान आहेत्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खालील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला
प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा-
प्रथम पारितोषिक– महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे(दहा लाख रुपये)
द्वितीय पारितोषिक– पोलीस अधीक्षक रत्नागिरीपोलीस उपायुक्त परिमंडळ-3 कल्याण (तत्कालीन पोलीस अधीक्षक रत्नागिरी) डॉ. संजय शिंदे(सहा लाख रुपये)
तृतीय पारितोषिक– जिल्हाधिकारी रायगड श्रीमती. शीतल तेली-उगले. (चार लाख रुपये)
महसूल व वन विभाग-
            जिल्हाधिकारी (अहमदनगर) अनिल कवडेजिल्हाधिकारी (अकोला) जी. श्रीकांतजिल्हाधिकारी (पालघर) अभिजित बांगरजिल्हाधिकारी (नंदुरबार) मल्लिनाथ कलशेट्टी, तत्कालीन जिल्हाधिकारी (जळगांव) श्रीमती. रुबल अग्रवालजिल्हाधिकारी (सोलापूर) रणजित कुमारजिल्हाधिकारी (नांदेड) सुरेश काकाणीजिल्हाधिकारी (चंद्रपूर) आशुतोष सलीलजिल्हाधिकारी (यवतमाळ) सचिन्द्र प्रताप सिंह. जिल्हाधिकारी (ठाणे)महेंद्र कल्याणकर
महसूल व वन विभाग (वन)-
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (भावसे), कांदळवनमुंबईएन.वासुदेवन (मवसे), सहायक वनसंरक्षक (वनसंवर्धन व भुमि अभिलेख) वन भवननागपूर के.एस.ईंगोले.
गृह विभाग-
अपर पोलीस आयुक्त (मोटार परिवहन) बृहन्मुंबई-अतुल पाटील.
कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग-
मुख्य सांख्यिक पुणे- उदय अण्णासाहेब देशमुखकृषि उपसंचालक सांख्यिकी पुणे- धनवंतराव पाटील.
 उद्योगउर्जा व कामगार विभाग-
उपसंचालक उद्योग संचालनालय मुंबई श्रीमती. वि. जु. शिरसाठअधिक्षकीय उद्योग अधिकारी उद्योग संचालनालय मुंबई सु. रा. लोंढे.
सार्वजनिक बांधकाम विभाग-
सहाय्यक अभियंता-श्रेणी-2 नागपूर श्रीकांत रा. गुलकोटवारसहाय्यक अभियंता-श्रेणी-2 नागपूर श्रीमती. रिता शुक्ला.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग-
शिक्षण विस्तार अधिकारी सातारा श्रीमती. प्रतिभा भराडेसहशिक्षकजि. प. वरवंडी तांडा नं. २पैठण जिल्हा औरंगाबाद  भरत धोंडीबा काळे.
जलसंपदा विभाग-
सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय श्रीमती.  मि. जी. कोळीलिपिक-टंकलेखक  मंत्रालय व प्र. भ. सावंत.
सदस्य सचिववैधानिक विकास महामंडळउर्वरित महाराष्ट्र- श्रीमती. प्रणाली मोहन वाडकेर.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *