शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, नाही तर आमच्यात सामिल व्हा – तृतीय पंथांचा सरकारला इशारा…
# खासदार राजू शेट्टींना निवेदन सादर
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमुक्ती द्या अशी मागणी करणारे तृतीय पंथीयांनी सरकारवर जोरदार हल्ला बोल चढविला आहे. शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमुक्ती द्या, नाही तर सरकारने आमच्यात सामिल व्हावे, असा सज्जड इशारा तृतीय पंथांनी दिला. त्यावेळी तृतीय पंथांनी सरकारला हा इशारा दिला. खासदार राजू शेट्टींनी शेतकरी कर्जमुक्तीचे आंदोलन सुरू केले आहे. त्यास तृतीय पंथीयांनी देखील पाठिंबा व्यक्त केला आहे. हे आंदोलन अधिक तीव्र करा, असे निवेदन सादर केले.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, या मागणीसाठी तृतीय पंथांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास खासदार राजू शेट्टींनी देखील पाठिंबा दिला आहे. तृतीय पंथीयांनीही शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी अनेकदा करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या २ मे रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनास खासदार राजू शेट्टी भेट देणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच सातबारा कोरा करण्यात यावा, अशा मागण्या असून, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारला हे जमत नसेल तर त्यांनी आमच्यात सामिल व्हावे अशी उपरोधिक टीकाही तृतीयपंथियांनी केली.