आदिम विकास परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नागेश अधटराव यांची निवड

आदिम विकास परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नागेश अधटराव यांची निवड

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश चंद्रकांत अधटराव यांची ‘आदिम विकास परिषद’ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नुकतेच आदिम विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश कोळी यांचे हस्ते त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

नागेश अधटराव हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रातील कार्यात सक्रीय आहेत. पंढरपूर शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्‍नांना सोडवण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. विशेषत: लाभार्थी नागरिकांना पांढरे, पिवळे, केशरी रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी तसेच रॉकेल, रेशनमाल पुरवठा न्याय्य पध्दतीने लाभार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. पंढरपूर तहसिल कार्यालयातील सेतू विभागात विविध कागदपत्रांसाठी नागरिकांकडून 5 रुपये फी असणार्‍या पावतीसाठी 20 रुपये व त्याहून अधिक फी आकारली जात असताना. नागेश अधटराव यांनी याविरुध्द आवाज उठवून सक्तीची जादा रक्कम घेण्यास सेतुमधील संबंधीतांना रोखण्याचे काम केले. वेळोवेळी पाठपुरावा करुन सेतुमध्ये होणारी नागरिकांची आर्थिक पिळवणुक थांबवली. याचबरोबर विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यांचा जनसंपर्क, त्यांचे प्रशिक्षण व त्यांनी केलेल्या विविध यशस्वी आंदोलनांची व  त्यांच्या लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याची माहिती आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिली.
आपल्यावर आदिम विकास परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी टाकलेला विश्‍वास सार्थ करुन दाखवु. तसेच समितीचे कार्य अधिक जोमाने वाढवून पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करु. अशी ग्वाही नागेश अधटराव यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष सुधीर घाडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष अधटराव, अनिल चव्हाण (सर), धीरज परचंडराव, नरेश जवंजाळ, नितीन पानकर, विजय सुरवसे, सुनील हिरणवाळे, मिलींद परचंडराव आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *