विश्व हिंदू परिषदेतर्फे महात्मा बसवेश्वर ,छत्रपती शिवाजी व परशुराम जयंती साजरी

पंढरपूर Live  दि.29 एप्रिल 2017

पंढरपूर येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज व परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,सर्वप्रथम एकत्रित पूजन बजरंग दलाचे शहर संयोजक सुनील बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रमुख रवींद्र साळे,रामेश्वर कोरे ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह तुकाराम खंदाडे ,उपस्थित होते ,त्यानंतर महात्मा बसवेश्वर ,छत्रपती शिवराय व परशुरामाचा जयघोष करण्यात येऊन सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली ,सदर कार्यक्रमास हिंदवी प्रतिष्ठान चे प्रताप साळुंखे ,सौरभ थिटे,तर परशुराम युवा मंचाचे गणेश लंके,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश कौजलगीकर ,तुषार दिवटे, संस्कार जाधव ,तर  विश्व हिंदू परिषदेचे सुभाष चव्हाण ,कृषिकेष गुंड,रवी साळुंखे,महेश शिंदे ,राजाभाऊ मुदगल,न्यानेश्वर तरालगट्टी,गणेश शिंदे तर दुर्गा वाहिनीच्या सौ .भाग्यश्री लिहिणे ,सौ.मंगल माने ,साक्षी कुलकर्णी ,ऐश्वर्या महाजन ,तर बजरंग दलाचे जीवन कुलकर्णी ,अनिल बाबर ,गणेश काळे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *