गुंड दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत खालावली असून त्याला कराचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे बोलले जात आहे.
नवी दिल्ली – मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत खालावली असून त्याला कराचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे बोलले जात आहे. मात्र, या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
दाऊदला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आल्याचे समजते. मात्र, या चर्चा निराधार असल्याचे दाऊदचा साथीदार छोटा शकील याने ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले.

