एकाच दिवशी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

एकाच दिवशी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

3 May. 2017

नाशिक – कर्जबाजारीपणा आणि त्यातच अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका शेतकरी महिलेचाही समावेश आहे. बागलाण तालुक्‍यात दोन, सुरगाणा येथे एक आणि निफाडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. एकाच दिवशी झालेल्या चार आत्महत्यांच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
जिल्ह्यात रविवार व सोमवार दोन दिवस असे अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, कांदा व डाळींब या पिकांचे अगोदरच भाव गडगडले असताना अवकाळीचा मोठा फटका शेतीला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत सोडली असून आत्महत्यासारखा पर्याय ते स्वीकारत आहेत. सुरगाणा तालुक्‍यातील हनुमंतपाडा येथील भगवान नानू गावित या शेतकऱ्यांने स्वतःला पेटवून घेत आपले जीवन संपवले. विशेष म्हणजे सुरगाणा तालुक्‍यातील शेतकऱ्याची ही पहिलीच आत्महत्येची घटना आहे. बागलाण तालुक्‍यातील करंजाड येथील सुनिल शांताराम देवरे आणि कंधाणे येथील नितीन कडू बिरारी या तरूण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून मरण कवटाळले. तर निफाड तालुक्‍यातील करंजगाव येथील अनिता अंबादास चव्हाण या शेतकरी महिलेनेही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *