मराठा आरक्षण संघर्ष समितीचे रामभाऊ गायकवाड यांना लोखंडी रॉडने मारहाण

पंढरपूर लाईव्ह- दि.9 मे 2017

महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांना आज दुपारी 11 वाजणेच्या सुमारास येथील विठ्ठल साखर कारखान्यानजीकच्या टाकळी गावात
अज्ञात 10 ते 12 जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याची माहिती मिळते.

त्यांचेवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पंढरपूर तालुका पोलिस अधिक चौकशी करत आहेत. हा हल्ला भिशीच्या पैशाच्या वादातून झाल्याची प्राथमीक माहिती मिळते. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून अद्याप पोलिसांकडून याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *