तावशी येथे सार्व.शंभू-बसव-बुध्द-टिपू-अहिल्या जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन.. विविध क्षेत्रातील मान्यवरांना होणार पुरस्कार वितरण…

पंढरपूर लाईव्ह दि.9 मे 2017

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील संभाजी ब्रिगेड च्या वतीने सार्वजनिक शंभू-बसव-बुध्द-टिपू-अहिल्या यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. नुकत्याच या सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम पवार-पाटील यांची निवड करण्यात आली. असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक प्रमोदराजे जगदाळे यांनी दिली.

पुढे बोलताना जगदाळे म्हणाले की, तावशी, ता.पंढरपूर येथे संभाजी ब्रिगेड चे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा सोहळा आयोजित केला आहे. या भव्य सोहळ्याचे हे सलग 11 वे वर्ष आहे. त्यानिमित्त तावशी गावात हा कार्यक्रम शनिवार दि. 13 मे ते सोमवार दि. 15 मे 2017 या कालावधीत संपन्न होणार आहे. हे तीन दिवस शिवधर्मियांचा सण म्हणून साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध व्याख्याने, विविध क्षेत्रातील 12 पुरस्काराचे वितरण, प्रबोधनाचे व अंधश्रध्दा विरोधी कार्यक्रम, गरजु विद्यार्थ्यांना एक वही- एक पेन वाटपाचा उपक्रम, तावशी फेस्टीव्हल, स्त्रीभ्रुण हत्या, गड वाचवा-पाणी वाचवा, झाडे लावा संबंधी उपक्रम व इतर अनेक समाजोपयोगी व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सदर सर्व कार्यक्रमास विविध शासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणीक, पत्रकारिता, विधी व न्याय, वैद्यकीय, क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सार्वजनिक शंभूराजे जन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ग्रामपंचायत सदस्य, पं.स. सदस्य शिवश्री पुरुषोत्तम शंकरराव पवार-पाटील यांची निवड झाली आहे.

विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांची व पुरस्कारांची नांवे पुढीलप्रमाणे-
मराठा शिवभुषण-योगेश यादव, मराठा मित्र-अल्ताफभाई तांबोळी, आदर्श पत्रकार-भगवान वानखेडे (संपादक-पंढरपूर लाईव्ह), आदर्श पत्रकार-रामभाऊ सरवदे(सा.ठिणगी), शिवराज्य मित्र-विठ्ठल कोळी, आदर्श शिक्षक (माध्यमीक)- रावसाहेब जाधव (सर), आदर्श शिक्षक (प्राथमीक)-धनाजी जाधव (गुरुजी), आदर्श समाजसेवक-विनोद शिंदे, कृषीभुषण पुरस्कार-राजेंद्र क्षिरसागर, आदर्श वैद्यकीय सेवा डॉ.रविंद्र गायकवाड आदींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दि. 13 मे ते 15 मे पर्यंत दररोज सायं. 6 वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आाहेत. या योग्य निवडीबद्दल तावशी परिसरातून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

सदर निवडीच्या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल यादव, सोलापूर जिल्हा संघटक प्रमोदराजे जगदाळे, अध्यक्ष अमोल कुंभार, पंचायत समिती गण प्रमुख धनसिंह यादव, कार्याध्यक्ष सिध्देश्‍वर यादव, उपाध्यक्ष दत्ता आसबे, संघटक रघुनाथ यादव यांचेसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *