👁 2 Views

शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या २५८० वी जयंती साजरी

पंढरपूर । प्रतिनिधी, पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या २५८० वी जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली, भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पंडित बंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंचशील व त्रिशरण सामूहिकरित्या घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हणमंत बंगाळे ( भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य) यांनी विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय, महाकारूणीक,
तथागत भगवान गौतम बुध्द यांची माहिती सांगताना असे सांगितले कि, इ.स. पुर्व ५६३ साली वैशाखी पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला. इ.स. पुर्व ५३४ मध्ये संसाराचा त्याग करुन ते अरण्यात गेले, इ.स. पुर्व ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेला ते बुद्ध झाले आणि जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन इ.स. पुर्व ४८३ मध्ये वयाची ८० वर्षे पुर्ण झाल्यावर वैशाखी पौर्णिमेलाच ते महापरीनिर्वाणास पोहोचले. या तीनही घटना एकाच दिवशी झालेल्या आहेत.

त्यांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाची घटना वैशाखी पौर्णिमेला घडली. म्हणुन सर्व लोक वैशाख महिन्यातील पौर्णिमेला सार्वजनीकरीत्या मोठा उत्सव आयोजीत करतात, भगवान गौतम बुद्धांनी संसाराचा त्याग केले कारण त्यांना या जगात शांतता हावी. आश्या प्रकारे कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव- शीतल बंगाळे, मोहिनी वाघमारे ( आरोग्य सेविका, अजनसोंड ), रुक्मिणी बंगाळे, तनुजा वाघमारे, अदिती नाईकनवरे, उत्तम बंगाळे, ढवळे, हणमंत बंगाळे ( भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य), कैलास बंगाळे, कमलेश बंगाळे, पंडित बंगाळे इतरपदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *