पंढरपूर :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर येथे सुरु असलेल्या कामांची आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पहाणी करुन या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन आवश्यकत्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज 65 एकर परिसरात सुरु असलेली कामांची पाहणी करुन, वाळवंट, पत्राशेड, स्कायवॉक, नामदेव मंदिर, नामदेव पायरी येथे भेट दिली. मंदिर समितीच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नवीन भक्त निवास बांधकामाची पाहणीही त्यांनी केली. तद्नंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी वाखरी पालखी तळ, भंडीशेगाव, बाजीराव विहीर, पिराची कुरोली, तोंडले येथे भेट देऊन येथील कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली व संबधीतांना आवश्यकत्या सुचना दिल्या.
या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी संजय तेली, संजय जाधव, तहसिलदार अनिल कारंडे,जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत, मुख्याधिकारी अभिजित बापट, उप अभियंता श्री. गावडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



