👁 10 Views

जनावरांचा चारा पाण्यासाठी बंधाºयात पाणी अढवा पाणी संघर्ष समिती; जिल्हा अधिकाºयांना निवेदन शैला गोडसे यांचा पुढाकार

सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयामध्ये जनावरांना पिण्यासाठी व चारा निमिर्तीसाठी किमान दोन मिटर पाणी आढवावे याचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देताना जि.प.स. शैला गोडसे, कल्याणराव काळे.

पंढरपूर : सध्या उजनी जलाशयातून सोलापूरच्या पिण्याच्या पाणीसाठी ९ हजार क्यूस्केस वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी पाणी पुरवठा योजना अंवलबून नसलेल्या बंधाºयांमध्ये अढविले जात नाही. त्या बंधाºयामध्ये पुढील किमान २ महिने जनावरांचा चारा व पिण्यासाठी २ मिटरने पाणी आढवावे अशा मागणीचे निवेदन भीमा पाणी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षा जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.
उजनी धरणापासून पंढरपूर तालुका ते सोलापूर दरम्यान मोहळ, मंगळवेढा तालुक्यात अनेक कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. मात्र पंढरपूर, गुरसाळे व मंगळवेढा या तीन बंधाºयांमुळे मोठ्या शहराचा पाणी पुरवठा योजना अंवलबून असल्याने याच बंधाºयामध्ये पाणी अढविण्याच्या सुचना प्रशासनाने पाठ बंधारे विभागाला दिली आहे. यामुळे इतर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे ऐन उन्हाळ्यात कोरडे राहणार आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसात नदी काठच्या परिसरात जनावरांच्या चारांचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. याची शासनाने दखल घेत, या बंधाºयांमध्ये किमान २ मिटर पर्यंत पाणी अढवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे जि.प. स. शैला गोडसे यांनी केली आहे.
या बंधाºयामध्ये पाणी अढविल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर नदी काठच्या गावातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. चारानिर्मिती होऊन चाराचा प्रश्न उद्भवणार नसल्याने याचा गर्भींयाने विचार प्रशासनाने करावा अशी मागणी भिमा पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकाºयांना देताना सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, जगदीश पाटील, विनोद कदम, हरिभाऊ घुले, विठ्ठल भोसले, सुनिल डोके, बी. बी. जाधव, नितीन नकाते, दामोदर देशमुख, दायानंद सोनगे, बसवराज पुजारी, डॉ. बाळासाहेब सरवदे, भागवत घुले यांच्यासह नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.
न वापरता पाणी वाहून जाणे चुकीचे
सध्या उजनी जलशयातून सोलापूरसाठी ९ हजार क्यूसेक्स वेगाने ६ टी.एम.सी. पाणी सोडण्यात येत आहे. सोलापूर साठी फक्त २ टि.एम.सी. पाणी आवश्यक असतना उर्वेरीत ४ टि.एम.सी. पाण्या पैकी २ टि.एम.सी. पाणी कर्नाटकला वाहून जाते. तर २ टि.एम.सी. पाणी नदी पात्रातील खड्यामध्ये जिरते. कर्नाटकला वाहून जाणारे २ टि.एम.सी. पाणी सर्व कोल्हापूर पध्दतीमध्ये किमान २ मीटर अढविल्यास नदी काठच्या गावांचा पिण्याच्या पाण्या बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चारांचा प्रश्न सुटणार आहे. असे शैला गोडसे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सकारात्मक
भीमा पाणी बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिल्यानंतर नदी काठच्या गावातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न याचा गांर्भीयाने विचार करुन बंधाºयामध्ये पाणी अडविण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असे अश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भीमा पाणी बचाव संघर्ष समितीला दिले आहे. त्यामुळे शेतकºयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *