*_टेक इट स्लो..!!_*
http://www.pandharpurlive.com
तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही? झोप लागली तरी खूप स्वप्न पडतात? मधूनच जाग येते? सकाळी उठल्यावर अस्वस्थ वाटतं? खूप उदास वाटतं? उठावंसंच वाटत नाही? तुम्ही कामं पुढे ढकलता? तुमची कामं कधीच वेळेत पूर्ण होत नाहीत? तुमच्या डेडलाइन चुकतात? आपल्याला खूप काम आहे असं सतत वाटतं? एक काम करताना अन्य कामं आठवत राहतात? चिडचिड होते? घरात कुणाशी बोलावंसं वाटत नाही? फोन सतत जवळ लागतो, व्हॉट्सअॅ प सारखं उघडून पाहता?-ही सारी लक्षणं जर तुमच्यात असतील तर समजा की तुम्हाला स्लो डाऊन करायची गरज आहे.
http://www.pandharpurlive.com
🍄 *_भूक लागण्यापूर्वी जेवा_*
विचारा स्वत:ला तुम्ही रोज कधी जेवता? खूप भूक लागल्यावर जेवता? आॅफिसमध्ये लंचटाईम होतोच म्हणून जेवता? की जेवायला वेळच नसतो तुम्हाला? अनेकदा असंच होतं. आपल्याला आता काही वेळात भूक लागणार आहे हे शरीर सांगत असतं, पण ते आपल्याला कधीच ऐकू येत नाही. पण जरा शांत रहा, कळेल की आपल्याला भूकेची जाणीव होतेय. पोटात खड्डा पडण्यापूर्वी ही जाणीव होताच जेवा! शांतपणे.
http://www.pandharpurlive.com
🍄 *_खाताय काय?_*
काल डब्यात कुठली भाजी हातेी असं विचारलं तर शंभरात ९० लोकांच्या दांड्या उडतील. कारण खाताना आपलं भाजीकडे, तिच्या चवीकडे, सुगंधाकडे,रंगाकडे लक्षच नसतं. आपल्या लक्षात त्याच गोष्टी राहतात ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात. चवी आठवत नाहीत कारण आपलं लक्ष नव्हतं जेवणात. भाजीकडे, पोळीच्या पोताकडे, स्पर्शाकडे लक्ष द्या. सोपं नाही हे, पहा जमतंय का..
http://www.pandharpurlive.com
🍄 *_आंघोळ करता ना?_*
दररोजच करतो आपण. पण पाण्याचा स्पर्श अनुभवलाय कधी? पहिला थेंब अंगावर कधी पडला हे जाणवतं? अभ्यास सांगतो की, हा स्पर्श जाणवला तर आपल्या मेंदूत जरा शांततेची केंद्र जागी होतात. आपला अटेन्शन स्पॅन वाढतो. आंघोळ उरकू नका, ती अनुभवा. पहा आपल्या शरीरात स्वच्छता आणि चैतन्याचा काही अंश जाणवतो का?
http://www.pandharpurlive.com
🍄 *_वेळ नाही म्हणता?_*
वेळ नाही म्हटलं की तो निघतच नाही. एक तरी गोष्ट आपल्या आयुष्यात असतेच जी आपल्याला खूप आवडते. त्यात नफ्यातोट्याचा विचार नसतो. ती करा. जे आवडतं ते, इतर काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला जे आवडतं त्यासाठी रोज फक्त ५ मिनिटं द्या.
http://www.pandharpurlive.com
🍄 *_रोज १ नवी ओळख_*
तुमचा फोनवर अफाट संपर्क असेल? प्रत्यक्षात तुम्ही रोज एका नव्या माणसाला भेटता का? वेगळ्या फिल्डमधल्या, वेगळं बोलणाऱ्या? किती दिवस झाले तुम्ही प्रत्यक्ष माणसांना भेटून, ओळख करुन? तसं करू नका. जरा व्हर्च्युअल लाइफ कमी करा, प्रत्यक्ष माणसांना भेटा. त्यातून तुम्हाला जो आनंद मिळेल, जो वर्तमानाचा एक फील मिळेल त्यानं तुम्हाला शांतही वाटेल आणि प्रसन्नही!
http://www.pandharpurlive.com
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




