सोलापूर – विविधकारणांमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या शहरात तीन तर ग्रामीण भागात एक घटना घडली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
१) अनिल अशोक बोराडे (वय ३२, रा. सोमवार पेठ) यांनी ११ मे रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात अज्ञात कारणावरून लाकडी वाशाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
२) सायबण्णा संगप्पा हेळवार (वय ४०, रा. शिवगंगा नगर भाग ४, नई जिंदगी) यांनी ११ मे रोजी आजारास कंटाळून राहत्या घरी लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
३)गंगाधर संगप्पा मणुरे (वय ६१, रा. स्वागत नगर जवळ, धनलक्ष्मी नगर) यांनी अज्ञात कारणावरून राहत्या घरी सिलींग फॅनला नायलॉन दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
४) तृप्ती किशोर साठे (वय २५, रा. बीबी दारफळ) यांनी ११ मे रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या चारही घटनांची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



