सोलापूर – महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील महत्त्वाच्या किल्ला बागेला टाळे लागले अाहे. जलतरण तलाव सतत बंद राहतो अाहे. तेथील पाणीशुद्धता तपासली जात नाही. शासनाचा एक जलतरण तलाव अद्यापही सुरू झाला नाही तर भर उन्हात शहरात अन्य ठिकाणी कुठे जायचे म्हटले तरी शहर बसची दैन्यावस्था अाहे.
केवळ ३१ बस रस्त्यावर धावतात. शहर उजाड झाल्यासारखी स्थिती अाहे. शनिवारपासून जलतरण तलाव सुरू होईल, असे सांगितले जाते. पण तेथे नियोजन नाही. प्रशासन अन् पुरातत्त्व विभागात समन्वय नसल्याने किल्ला बागेचा विकास शक्य नाही, अशी अाजची स्थिती अाहे.
महापालिकेचा तलाव बंद, शासनाचा अद्याप सुरू नाही
शाळांतील मुलांना उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर सर्वात प्रथम पालकांचा कल आपल्या पाल्यांना पोहायला शिकवायचा असतो. त्यासाठी मासिक पास काढण्यात येतो. हव्या त्या जलतरण तलावावर पालक आपल्या पाल्यांना पोहाेण्यास पाठवतात. सध्या महापालिकेच्या दोन्ही जलतरणात मिळून सुमारे चार हजार विद्यार्थी पोहण्याचेे प्राथमिक शिक्षण घेत आहेत. एवढा प्रचंड प्रतिसाद असताना अचानक एखादा तलाव बंद ठेवला तर दुसऱ्या तलावावर गर्दी पडते. त्यामुळे पालिकेचे सर्व नियोजन कोलमडते. सध्या पालिकेचा अशोक चौकातील मार्कंडेय जलतरण तलाव बंद आहे. पार्क चौकातील वीर सावरकर तलाव सुरू आहे. तेथे गर्दी वाढली आहे. अन्य वेळेस फक्त ५०० सदस्य पोहण्यास येतात. परंतु एप्रिल व मे या दोन महिन्यात गर्दी वाढल्यामुळे सकाळी ते दुपारी १२ पर्यंत बॅचेस करण्यात आले आहेत. दुपारी ते महिला आणि ते फक्त शिकाऊ मुलींसाठी स्वतंत्र बॅच ठेवण्यात आली आहे.
शासकीय तलावही प्रतीक्षेत : विजापूररस्त्यावरील आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या शासकीय जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारीपासून हा तलाव सुरू होणार असल्याची क्रीडा कार्यालयाची घोषणाच राहिली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्यात पाणी लवकर सोडल्यामुळे त्यातील फरशा तडकल्या. फरशा परत बसविल्या. त्यानंतर पाण्याची कमतरता होती. तीही दूर झाली. तलाव भरलाही. परंतु त्यातील पाणी कमी होत आहे. तलावातील पाणी कशामुळे कमी होत आहे, याचा शोध सुरू असल्यामुळे हा तलावही अद्याप सुरू नाही.
मार्कंडेयतलाव उद्या सुरू
– गर्दी वाढल्यामुळे आम्ही सकाळी सहा आणि दुपारी महिला मुलींसाठी दोन बॅचेस केले आहेत. क्लोरीन सोडून फिल्टरेशन करण्यासाठी दोन दिवस तलाव बंद ठेवावा लागतो. तरीही आम्ही सुटीच्या दिवशी २४ तास काम करतो. बंद असलेला मार्कंडेय जलतरण तलाव शनिवारी सुरू होईल. नजीरशेख, पालिका क्रीडाधिकारी
– स्मार्ट सिटीत एका बागेचा विकास होणार आहे. बागा करण्यास अडचण येत आहेत. संभाजी तलाव येथील सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार काम सुरू आहे. उद्यान सुशोभीकरणासाठी निधी आहे. सिटीबस बंद आहेत. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. बजेट झाल्यावर सर्व कामे मार्गी लागतील. मागे काय झाले यापेक्षा आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही कामे मार्गी लावू. पुढील वर्षात मुलांसाठी शहरात काहीतरी दिसेल. त्यानुसार भाजप सरकारने काम सुरू केले आहे.
शोभा बनशेट्टी, महापौर
पुढील स्लाइडवर वाचा,१९२ पैकी फक्त ३१ बस रस्त्यावर…
१९२ पैकी फक्त ३१ बस रस्त्यावर
महापालिका परिवहन विभागाकडील १९२ बसपैकी सध्या केवळ ३१ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. पूर्वी २८ मार्गांवर बस धावायच्या. आता ७ मार्ग बंद करावे लागले. तसेच आहे त्या मार्गांवर सेवा देण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे. २१ मार्गांपैकीही काही बंद करावे लागत आहेत. सध्या परिवनहनचे रोजचे उत्पन्न अडीच ते पावणे तीन लाख रुपये तर खर्च ३ लाख ४० हजार रुपये आहे. त्यामुळे बस चालू ठेवून रोज ७५ हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. ही स्थिती गेल्या अनेक दिवसांपासून असूनही महापालिकेचे याकडे म्हणावे तसे लक्ष नाही.
सध्या सुट्या अाहेत. शालेय मुलांसाठी विशेष बसची सोय करणे अवघड जात अाहे. येत्या १२ जून पर्यंत कसेबसे एकूण ५० बस सुरू करण्याचा परिवहन समितीचा मानस आहे. कारण शाळा सुरू झाल्यानंतर बसची जास्त गरज असणार आहे. दररोज तोट्यामध्ये असणाऱ्या परिवहनला बंद बसच्या दुरुस्तीसाठी पैशाची तरतूद करणे अवघड आहे. त्यासाठी महापालिकेने परिवहनला मदत केल्याशिवाय दुरुस्ती होणार नाही, आणि बस रस्त्यावर धावणारच नाही.
शहरातील महत्त्वाची बाग आहे बंद
पूर्वी हुतात्मा बगिचा हे बाळगोपाळ आणि अबालवृद्धांसाठीचे एकमेव मनोरंजनाचे स्थळ होते. आताही या बागेची तिच क्रेझ कायम आहे. पण तेथील अस्वच्छता आणि हिरवळीचा अभाव पाहता आता ही आवड किल्ला बागेकडे वळली आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून किल्ला बाग बंद आहे.
पालिका प्रशासन आणि पुरातत्व खाते यांच्यात बिघाडी झाल्याने त्याचा परिणाम बागेला आणि अप्रत्यक्षपणे सोलापूरकरांना भोगावा लागत आहे. पूर्वी ही बाग सायंकाळी चार वाजेपर्यंत पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असायची. आता ती पूर्णपणे पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.
पुरातत्त्वच्या ताब्यात
– आता बाग आमच्या ताब्यात नाही, ती पुरातत्त्व खात्याने ताब्यात घेतली आहे. आमच्याकडे असली असती तर आम्ही ती सर्वांसाठी खुली ठेवली असती.
विजयकुमार जाधव, उद्यान विभाग प्रमुख
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




