श्रीनगर, दि. 12 – सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. शुक्रवारी (12 मे) देखील पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला आहे. जम्मूमधील अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या गोळीबारत बीएसएफचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले.
यापूर्वी बुधवारी रात्री जवळपास 10.45 वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा पती जखमी झाला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगित दिल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात येत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



