👁 7 Views

जिओमुळे इतर मोबाईल कंपन्याच्या ताळेबंद कोलमडले

आयडीया कंपनीला 325 कोटी रूपयाचा तोटा
मुंबई, दि. 13- चौथ्या तिमाहीतही आयडिया सेल्यूलर कंपनीला तब्बल 325 कोटी रूपयाच्या तोटयाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 775 कोटी रूपयाचा नफा झाला होता.
भारतातील सर्वात श्रिमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने सर्वच मोबाईल कंपन्याच्या ताळेबंदावर परिणाम केला आहे. या तिमाहीत कंपनीला व्याजावर 15.5 टक्के जास्त रक्कम मोजावी लागली यामुळेही ताळेबंद कोलमडला असल्याचे सांगीतले जाते.
कंपनीला व्हाईस आणि डेटातही जोरदार फटका बसला असल्यामुळे या तिमाहीत कंपनीचा महसूल 14 टक्‍क्‍यानी कमी होऊन तो केवळ 8126 कोटी रूपये इतका झाला आहे. तिसऱ्या तिमाहीतील महसूल 8662 कोटी रूपये इतका होता. या तिमाहीत कंपनीच्या ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे,
कंपनीने ताळेबंद जाहीर केल्यानंतर जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की आक्‍टोबर महिन्यापासून मोबाईल क्षेत्राला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. या कारणामुळे आता आयडीया सेल्यूलर आणि व्होडाफोन या कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत. या विलीनीकरणासाठी स्पर्धा आयोगकडे आणि शेअर बाजार नियंत्रक सेबीकडे परवाणगी मागण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या पुर्ण वर्षात सर्वच मोबाइल कंपन्याच्या महसूलावर आणि नफ्यावर परिणाम झाला आहे. रिलायन्सने इतर मोबाईल कंपन्याचे ग्राहक मिळविण्याकरीता मोठ्या प्रमाणात सवलती दिल्याने ग्राकह रिलायन्सकडे वळले आहेत. त्यामुळे रिलायन्सचा महसूल तर वाढणार नाहीच परंतू इतराचा कमी होणार आहे.
अगोदर रिलायन्सने मोफत सेवेचा धमाका सुरू केला होता. आता मात्र या कंपनीने काही प्रमाणात दर आकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्‍यता असल्याचे सांगीतले जात आहे.
रिलायन्स जिआकडे मोठया प्रमाणात गंगाजळी आहे. या कंपनीने 5 सप्टेबर पासून मोफत सेवा सुरू केली. ती 31 मार्च पर्यंत चालली आहे. या काळात इतर कंपन्याचे बरेच ग्राहक विशेषत: फोनचा वापर मोठया प्रमाणात करणारे शहरातील ग्राहक रिलान्सकडे वळले आहेत. इतर कंपन्यानी रिलायन्स जिओच्या अयोग्य स्पर्धेविरोधात तक्रारी केल्या आहेत.
त्याचबरोबर आपले ग्राहक टिकऊन ठेवण्यासाठी इतर कंपन्याना आपल्याही ग्राहकांना सवलती द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा नफा आणि महसूल कमी झाला आहे. भारतातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी असलेल्या एअर टेल कंपनीच्या नफ्यात 72 टक्‍क्‍याची घट झाली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *