पुणे : राज्यभरात वेगवेगळ्या भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असतानाच मान्सूनही अंदमानात दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेटे या भागात येत्या 72 तासात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामानाच्या ‘डायनॅमिक’ प्रकारच्या प्रारूपांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया यांवरून ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने हा अंदाज वर्तवला आहे.
गेल्यावर्षी 18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता. यंदा दर वर्षीपेक्षा दोन दिवस आधीच मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत. दर वर्षी मान्सून साधारणत: 1 जूनला केरळात येतो, त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये राजस्थानमधून त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो.
हवामान विभागाने 2017 साठी वर्तवलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या जवळ पाऊस पडेल.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




