👁 10 Views

क्रिकेट खेळताना वाद; बॅटने १६ वर्षाच्या मुलाची हत्या

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुंबईतील धारावी येथे १६ वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

धारावीतील गांधी मैदान येथे शनिवारी संध्याकाळी परिसरातील मुले क्रिकेट खेळत होती. या दरम्यान आमिर हुसैन या १६ वर्षाच्या मुलाचा अन्य मुलांसोबत वाद झाला. काही वेळाने या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन अल्पवयीन मुलांनी स्टम्प आणि क्रिकेटच्या बॅटने आमिरला बेदम मारहाण केली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आमिर मैदानातच कोसळला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आम्ही या घटनेचा तपास करत असून हत्येचे नेमके कारण चौकशीनंतरच समजेल असे पोलिसांनी सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *