👁 13 Views

अपघाती मृत्यूचा क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला दणका

– विम्याच्या रकमेसह 7 टक्‍के दराने परतावा बंधनकारक
– अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा आदेश
पुणे (प्रतिनिधी) – वाहन परवाना दाखल केला नाही, म्हणून शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूचा क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. विम्याची रक्कम 1 लाख रुपये 8 मे 2009 पासून 7 टक्के वार्षिक व्याजदराने निकालाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्याच्या आत देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के.वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे आणि एस. के. पाचरणे यांनी दिला आहे. याबरोबरच तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
याबाबत उज्वला विलास साळुंखे (रा. सावरदरे बु. ता. भोर) यांनी व्यवस्थापक ओरिएंटल इन्श्‍युरन्स कंपनी, लि. नागपूर, तालुका कृषी अधिकारी भोर आणि कबाल इन्श्‍युरन्स कंपनी, शिवाजीनगर यांच्याविरोधात 17 डिसेंबर 2012 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचे पती विलास हे शेतकरी होते. ते 8 मे 2009 रोजी रासायनिक खत आणण्यासाठी दुचाकीवरून बाजारात चालले होते. त्यावेळी अशोक लेलॅण्ड कंपनीच्या वाहनाने विलास यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी रुग्णालयात नेत असताना विलास यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उज्वला यांनी तलाठी कार्यालयात सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह दावा दाखल केला. त्यानंतर दावा मंजूर झाला की नामंजूर, हेही तक्रारदारांना कळविण्यात आले नाही. त्यामुळे उज्वला यांनी अतिरिक्त ग्राहक मंचात दावा दाखल केला. विम्याची रक्कम 1 लाख रुपये व्याजासह, नुकसानभरपाईपोटी 20 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली. ओरिएंटल विमा कंपनीच्या वतीने लायनन्स नसल्याने दावा नामंजूर करण्यात आल्याचे ओरिएंटल कंपनीच्या वतीने ग्राहक मंचात सांगण्यात आले. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाने व्याजासकट भरपाईचा आदेश दिला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *