जालना शहरातील लालबाग परिसरातील राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शहरातील हनुमान घाट परिसरातील असणाऱ्या विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्यात आली आहे.
मोलमजूरी करून कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ऋषीबाबा तांबे यांनी आपली मुलगी प्रियंका (९) व मुलगा सागर (७) यांच्यासह आत्महत्या केली. बुधवारी दुपारच्या सुमारास तांबे यांनी विहिरीवर जाऊन पहिल्यांदा दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनास पाठवले आहे. मात्र आत्महत्येमागिल कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





