👁 10 Views

आता हिंदीतून शिका इंजिनिअरिंग

भोपाळ

शिक्षणाला भाषेचा अडथळा नसावा, या उद्देशाने उच्च शिक्षण देखील राष्ट्रीय भाषेतून घेता यावे म्हणून मध्यप्रदेश प्रदेशात त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पुढील सत्रापासून हिंदीमधून करता यावा म्हणून जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये इंजिनिअरिंगचे प्रवेश सुरू होतील त्यावेळी प्रवेश अर्जावर विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले जातील. इंजिनिअरिंग कोणत्या भाषेतून शिकणार? हिंदी की इंग्रजी असे हे पर्याय असतील. मंगळवारी हा निर्णय राजीव गांधी प्राद्योगिक विद्यापीठाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी काही वरिष्ठ प्राध्यापकांनी हिंदीतून इंजिनिअरिंग शिकणे म्हणजे पुन्हा देशाला मागे घेऊन जाण्यासारखे आहे, अशी टीका करत त्याला विरोध दर्शवला होता. हिंदीत तंत्रज्ञानासंदर्भातील फारसे शब्द नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत होईल, असं मत अनेकांनी व्यक्त केलं. मात्र उच्चतंत्र शिक्षण मंत्री दीपक जोशी यांनी त्यावर उत्तर दिले की, ‘विद्यार्थ्यांनी असे कठीण शब्द इंग्रजीप्रमाणेच वापरले तरी चालतील. पण इंग्रजी खराब आहे म्हणून इंजिनिअरिंग शिकू न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होईल’.

त्यामुळे आता मध्यप्रदेशमधील प्राध्यापक आणि विद्यार्थी हिंदीतून तांत्रिक शब्द शोधण्याच्या कामाला लागले आहेत. मात्र भविष्यात नोकरीचे काय? हिंदीतून शिकणाऱ्याला मोठ्या कंपन्या स्वीकारतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *